Swapna Jaikar retirement
प्रिय स्वप्ना जयकर वहिनी,
जरी विरहाचा, दिन सोन्याचा भासतसे हा आम्हां
आनंदाने आम्ही सारे देतो शुभेच्छा तुम्हां
प्रामाणिकता नसांत भिनली, कामही केले छान
विनम्रताही तुमच्या ठायी, नसे 'खूर्ची'चा अभिमान
कठिण प्रसंगी उभे ठाकला तुम्ही सहका-यांसाठी
सदैव ठेविला हात मदतीचा सर्वांच्या पाठी
चुकले कुणी जरी, उदार मनाने केली तुम्ही क्षमा
आनंदाने आम्ही सारे देतो शुभेच्छा तुम्हां
निवृत्ती ही नाममात्र हा नसे अंत कार्याचा
हा तर दुसरा टप्पा आता मनासारखे जगण्याचा
कर्तव्यपूर्तीचे सदैव ठेवुनी ह्रदयामध्ये भान
आजवरी जे हळूच निसटले आनंदाचे क्षण
जगून घ्या ते आनंदी क्षण नका बाळगू तमा
आनंदाने आम्ही सारे देतो शुभेच्छा तुम्हां
मिळो तुम्हां जे जे उत्तम कधी काही न उणे पडो
लाभो आयु आरोग्य अन् प्रियजनांचा सहवास घडो
सगेसोय-यांचा सदैव राहो आधाराचा हात
निरंत लाभो जीवनी ह्या, पतीची खंबीर साथ
कुलदैवताचा अखंड लाभो वरदहस्त हा तुम्हां
आनंदाने आम्ही सारे देतो शुभेच्छा तुम्हां
©️ सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे
📞 ८५९१३ २५२०४
Comments
Post a Comment