श्रावण
स्पर्धेसाठी आला श्रावण आला श्रावण आला श्रावण सृष्टीचे हे रूप नवे रिमझिम झरणा-या मेघांनाही इंद्रधनुचे रंग हवे भोळीभाबडी आई करीते व्रतवैकल्ये अन् उपवास बाळासाठी सौख्य, संपदा अन् शारदेचा घडो वास मंदिरेही फुलून जाती होई भक्तांची दाटी प्रसन्न होऊनी मनोकामना पूर्ण करी मग जगजेठी सणवारांची रेलचेल अन् पक्वान्नांची भरली ताटे तृप्त मनाने भोजन करीता आनंदची की ह्रदयी दाटे रक्षाबंधन, दहीहंडी अन् मंगळागौरीचे ते खेळ ह्या सा-यांसह सुरेख जमतो श्रावण महिन्याचा तो मेळ ©स्वाती शृंगारपुरे बोरीवली, मुंबई 📞 ८६९२८९३९८४