Posts

Showing posts from February, 2026

Swapna Jaikar retirement

प्रिय स्वप्ना जयकर वहिनी,  जरी विरहाचा, दिन सोन्याचा भासतसे हा आम्हां आनंदाने आम्ही सारे देतो शुभेच्छा तुम्हां  प्रामाणिकता नसांत भिनली, कामही केले छान विनम्रताही तुमच्या ठायी, नसे 'खूर्ची'चा अभिमान  कठिण प्रसंगी उभे ठाकला तुम्ही सहका-यांसाठी सदैव ठेविला हात मदतीचा सर्वांच्या पाठी चुकले कुणी जरी, उदार मनाने केली तुम्ही क्षमा  आनंदाने आम्ही सारे देतो शुभेच्छा तुम्हां  निवृत्ती ही नाममात्र हा नसे अंत कार्याचा  हा तर दुसरा टप्पा आता मनासारखे जगण्याचा कर्तव्यपूर्तीचे सदैव ठेवुनी ह्रदयामध्ये भान आजवरी जे हळूच निसटले आनंदाचे क्षण जगून घ्या ते आनंदी क्षण नका बाळगू तमा  आनंदाने आम्ही सारे देतो शुभेच्छा तुम्हां मिळो तुम्हां जे जे उत्तम कधी काही न उणे पडो लाभो आयु आरोग्य अन् प्रियजनांचा सहवास घडो सगेसोय-यांचा सदैव राहो आधाराचा हात निरंत लाभो जीवनी ह्या, पतीची खंबीर साथ  कुलदैवताचा अखंड लाभो वरदहस्त हा तुम्हां  आनंदाने आम्ही सारे देतो शुभेच्छा तुम्हां ©️ सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे  📞 ८५९१३ २५२०४

स्नेहांकिता स्नेहसंमेलन पुणे १८ जानेवारी २०२६

.//श्री// *गणेश पार्वती*  निर्मिती: संस्कृती चांकाप्र महिला मंडळ -कांदिवली, बोरीवली  संहिता लेखन - सौ. स्वाती  शृंगारपुरे  दिग्दर्शन: सुलेखा देशपांडे  पात्रे ७ १) गणेश - २) पार्वती - ३) उंदीर मामा- ४) ५) ६) ७)       (माणसे)- वेळ ७ मिनिटे पार्वती: (वाट पहात असते...)  हा गजानन का बरं आला नाही अजून?  गणेश: आलो बरं माते... १० दिवस पृथ्वीलोकावर राहून, मानवजातीचा पाहुणचार घेऊन आज मी कैलासावर परत आलोय. पृथ्वीलोकावरचा गणेशोत्सव संपन्न झाला... नमस्कार करतो माते...  मूषक : वंदन करतो माते, गणराजासोबत मलाही पृथ्वी ची सैर घडली..  पार्वती : वाह वाह! ( आशिर्वाद देते ) पार्वती: (गणेशाकडे वळून)  या या गणेशा, तुमच्याविना इथे फारच सुनं सुनं वाटत होतं. बरं, ते जाऊ दे. कसं काय पृथ्वी वरील वास्तव्य? तिकडे सारं काही ठीकठाक आहे ना?  गणेश: माते, पृथ्वीवरील वास्तव्य  खूपच आनंददायी झालं. लोकांनी माझं जल्लोषात अन् उत्साहात स्वागत केलं... पहा ना...  (आता इतर ४ जणी पुढे येतात. गणेशोत्सवाचा पहिला दिवस... गणपती घरी आणतानाचा सीन...)...