Posts

Showing posts from March, 2018

सबला

*स्वातीचे शब्दमोती*        *सबला* नारी जातीच्या यशाची गाथा सतत तू स्मरत रहा नितांतसुंदर जीवनात ह्या सबले तू सजग रहा लाख संकटे येतील जरी ढळू देऊ नकोस तोल संकटातूनी मार्ग काढूनी सिद्ध कर स्वतःचं मोल चौथरे , गाभारे प्रवेशबंदी हे सारं फोल आहे तुझ्या मनातला भक्तिभाव हाच खरा अनमोल आहे मुलाबाळांना शिक्षण दे कर त्यांच्यावर सुसंस्कार मुलगा मुलगी भेद नको कर स्त्रीभ्रूणहत्या हद्दपार कार्यालयातील अधिकाराचे पद तू जरूर घे घराचेही घरपण जप मांगल्याचा सूर दे मार्गामध्ये काटे येतील कधी येतील मोठे अडसर त्यातून मार्ग काढत तू सिद्ध कर स्वतःचं मोल अशक्य तुला काही नाही विश्वास ठेव स्वतःवरी कवेत घेण्या अंबरास ह्या मुक्त स्वच्छंद घे भरारी  - स्वाती शृंगारपुरे ☎ 8692893984 https://swaticheshabdamoti.blogspot.in

संकष्टी

*स्वातीचे शब्दमोती* *संकष्टी* श्रीकृष्णाने केली लोण्याची चोरी गवळणी आल्या यशोदेच्या घरी गवळणींनी कान्हाची केली तक्रार यशोदेला वाटली काळजी फार गणेशाला तीने विनवणी केली बुद्धी दे माझ्या कान्हाला चांगली संकष्टी चतुर्थीचे  व्रत तीने केले गणेशाने कान्हाला आशिर्वाद दिले मित्रांनो तुम्हीही होऊ नका कष्टी गणेशाच्या कृपेसाठी करा संकष्टी