काळवीटाच्या निमित्ताने
*स्वातीचे शब्दमोती* *काळवीटाच्या निमित्ताने...* अखेर सलमान 'जेल की सलाखों के पीछे गेला !' काळवीटाला न्याय मिळाला ! कानून से बढकर कोई नही. पण कानूनमध्ये पण 'सबको सही इन्साफ मिलने के लिये' तरतुदी आहेतच... गेला गेला म्हणताना कानून च्या ह्याच पळवाटांनी पळत पळत आपला सल्लूभाई बाहेर येऊन त्याच्या आलिशान घरात पोहोचलादेखील ! पण एकूणच प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. अनेक गुन्हे करणारा हा गुन्हेगार "बिइंग ह्युमन" म्हणत आज अभिमानाने मिरवतो आहे. त्याचे चाहते बेंबीच्या देठापासून ओरडून त्याने केलेली सत्कृत्ये जगापुढे मांडत आहेत. त्यात भर प्रसारमाध्यमांची ! स्वतःच्या नैतिक , सामाजिक जबाबदारीचं जराही भान प्रसारमाध्यमं ठेवत नाहीत. जेथे जिथे कुठे "बाईट" मिळण्याची शक्यता वाटते , तिथे हे पापाराझींचे थवे धावत सुटतात. आता काय तर वकील कोर्टात शिरले.. सलमान को जमानत मिलेगी या नही ! आली आली.. आता अलवीरा आली , अर्पिता आली... सीधे कोर्ट की तरफ चल पडी !! माॅर्निंग वाॅक करणा-या सलमानच्या वडीलांची "आसू छुपाते छुपाते" दिलेली प्रतिक्रिया...