Posts

Showing posts from December, 2017

विरहक्षण

रोज एक कविता... *विरहक्षण* ह्रदयामध्ये सलणा-या विरहाच्या जखमा मिटवून पहा अधूनमधून आपल्यामधले अलवार क्षण आठवून पहा.. आठवेल का तुला आता आपली पहिली भेट पापण्यांच्या कमानीआडून ह्रदये जिंकली थेट उठतील का नयनांत तुझ्या आठवणींचे तरंग दिसतील का त्यात आपल्या प्रेमाचे रंग रंगामध्ये प्रेमाच्या हळूच जरासा रंगून पहा अधूनमधून आपल्यामधले अलवार क्षण आठवून पहा.. आठवतं का तुला आपण सागरतीरी बसायचो गुजगोष्टीत रमून आपण दिलखुलास हसायचो कळत नसे नभी कधी अवतरायचा चांदवा सवे त्याच्या बागडत येई चांदण्यांचा थवा चांदणभरल्या नभाला त्या तुझ्या मनात साठवून पहा अधूनमधून आपल्यामधले अलवार क्षण आठवून पहा.. आठवणींच्या डोहात दिसेल आगगाडीचा प्रवास हाती माझ्या हात तुझा अन् हवाहवासा सहवास सुटता गाडी सुटून जातील हातामधले घट्ट हात इंजिनाच्या धुरामध्ये विरून जाईल प्रेमळ साथ सहवासाचे रेशिमबंध दिठीत तुझ्या दाटवून पहा अधूनमधून आपल्यामधले अलवार क्षण आठवून पहा.. *स्वातीचे शब्दमोती* *स्वाती शृंगारपुरे* ☎ 8692893984 https://www.facebook.com/rojekkavita

विनोदकाका

*स्वातीचे शब्दमोती* ( वडीलांचे मित्र श्री. विनोदबापू कर्णिक ह्यांच्या निधनानंतर व्यक्त केलेल्या अंतःकरणातील भावना ) विनोदकाका....      शुक्रवारी भल्या पहाटे फोन खणखणला आणि "शैलेष कर्णिक" ही अक्षरं स्क्रीनवर झळकली. चांगलं/वाईट काहीही घडलं की पहिला फोन ताईला म्हणजे मला करायची शैलेषची नेहमीचीच सवय. आज नक्कीच काहीतरी अघटीत घडलंय् हे त्याच्या "हॅलो"ह्या कातर स्वरांनीच सांगितलं आणि काळजात चर्र झालं . शंकेची पाल चुकचुकली. ही शंकेची पाल मोठी वाईट असते काका ! नको असताना मनात येणा-या शंका ही सहजतेने ख-या ठरवते आणि स्वतःचा पालीचा जन्म सार्थकी लावते.      तर.. तेच घडलं ! चुकचुकणा-या पालीने डाव साधला. " विनोदकाका गेले" एवढंच बोलून शैलेषने फोन कट केला. त्याच्या डोळ्यात साठलेलं आभाळ मला माझ्या घरात जाणवलं.  नक्कीच  त्यालाही आठवले असाल त्याच्या वाढदिवसाला धडपडत आशिर्वाद द्यायला घरी येणारे तुम्ही ! आईबाबा दोघेही नाहीत ह्यावर्षी आशिर्वाद द्यायला   ही जाणीव मोडीत काढणारे तुम्ही !      पहाटेची रम्य वेळ अचानक काळरात्र भासू लागली. मन ट...