वारसा
*स्वातीचे शब्दमोती* *वारसा* माझे डपाप कुटुंब आहे साजिरे गोजिरे सण उत्सवांचे इथे सदा वाहतात वारे येता गोकुळ अष्टमी जाती आनंदून सारे चला जाऊ डहाणूला दहीहंडी फोडू या रे दोन दिवसांचा सण आले आनंदा उधाण सजे पाळणा कृष्णाचा गाऊ भजन, कवन करू उत्सवाचा काला पालखीही मिरवूया घरोघरी पूजेसाठी गावातून फिरवूया भेट होईल सा-यांची कृष्णजन्मा निमित्ताने ओढ लागली भेटीची उचंबळती ही मने नव्या पिढीलाही देऊ सण उत्सवांचा वसा पुढे चालवत नेऊ संस्कृतीचा वारसा - ©️®️सौ. स्वाती शृंगारपुरे बोरीवली,मुंबई २४/०७/२०२४ 📞 85913 25204