Posts

Showing posts from May, 2022

काॅ.मदन फडणीस

 * राष्ट्रहिताय कामगारहिताय च !*  कामगारनेते काॅम्रेड ॲडवोकेट मदन फडणीस      दि. ०२ मार्च, २००९. शिवाजी पार्क स्मशानभूमीवर अफाट जनसागर लोटला होता. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य कामगार स्त्रीपुरुष बस, टॢक किंवा मिळेल त्या वाहनातून धाव घेत होते. आपले पितृछत्र हरपल्याची भावना प्रत्येक कामगार स्त्री पुरुषांच्या मनात दाटून येत होती.         कोण होते हे कामगारांचे नेते? तर हे होते काॅम्रेड ॲडवोकेट मदन फडणीस!       दि. २३ सप्टेंबर, १९२३ रोजी एका सुसंस्कृत कुटुंबात मदनजींचा जन्म झाला.  त्यांचे वडील ब्रिटीश राजवटीत पोलिस खात्यात अधिकारी होते. वडील ग. द. फडणीस व आई सरस्वतीबाई ह्यांच्या प्रेमळ छत्राखाली कोल्हापूर येथे शालेय शिक्षण पूर्ण करून अर्थार्जनासाठी मदनजींनी मुंबई गाठली व तिथे त्यांना रेशनिंग इन्स्पेक्टर ची नोकरी मिळाली.       थोडे आर्थिक स्थैर्य आल्यावर मूळचे कोल्हापूरपासूनच गुप्त पद्धतीने चालत असलेले इंग्रज राजवटीविरुद्धचे कार्य आणि कामगार सं...