जरा विसावू ह्या वळणावर
*पा.ता.मराठी सा. मंडळकरिता* मान्यवर साहित्यिकांनी दिलेल्या आठ ओळींवरून बेतलेली कथा लेखिका - सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे *शीर्षक - जरा विसावू ह्या वळणावर* *डोंगरालगतच्या ओढ्याकाठी निसर्गसौंदर्य लाभलेलं एक छोटंसं सुंदर गाव.* सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ह्या गावावर निसर्गानं मुक्त हस्तानं हिरवाईची उधळण केली होती. *ह्या गावातल्या ग्रामीण रुग्णालयात समृद्धीची परिचारिका म्हणून नेमणूक झाली.* एके दिवशी समृद्धी गावात डेरेदाखल झाली अन् गावाच्या मध्यवर्ती चौकात असणाऱ्या रुग्णालयात आली. रुग्णालयाच्या मेट्रन बाईंना स्वतः ची ओळख करून देऊन तिनं वसतीगृहाची चौकशी केली. अतिशय आपुलकीने बाईंनी स्वतः तिला वसतीगृहात नेऊन तिची खोली दाखवली. छोटीशीच पण नीटनेटकी खोली समृद्धीला खूप आवडली. चटकन स्वतःचे सारे आवरून समृद्धीने रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता उरकला आणि लगेचच ती ड्युटीवर हजर झालीदेखील! आता रोजच ती वेळच्या वेळी रुग्णालयात जाऊ लागली. असेच दिवस सरकू लागले. *वृक्षप्रेमी असलेली समृद्धी ह्या गावात नेमणूक झाली म्हणून अगदी खुशीत होती.* तिच्...