Posts

Showing posts from June, 2022

शेवळं

 *स्वातीचे शब्दमोती* *शेवळं* आनंदी आनंद गडे..  शेवळंच शेवळं चोहीकडे सोडे घालू की कोलंबी घालू कणी करू की खिमा घालू हाच मला गं प्रश्न पडे आनंदी आनंद गडे..  प्रश्न सोडवी मी कायस्थ गृहिणी एक वेळ खीमा तर दुस-या वेळेस कणी कोलंबी मिळाली तर तीही आणी सोड्याची तर घरात भरली आहेच बरणी मग मुळीच ना मज प्रश्न पडे  शेवळंच शेवळं चोहीकडे... ©️स्वाती शृंगारपुरे