Posts

Showing posts from February, 2020

माझी अविस्मरणीय दिवाळी

माझी अविस्मरणीय दीवाळी      साधारण १९८०च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ. दीवाळीचा पहिला दिवस होता. त्यामुळे घर भरलेलं. तसंही एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही घरचीच १५ माणसं. त्यात दीवाळीनिमित्त आलेले पाहुणे !       तर, असा हा उत्साहवर्धक दीवाळीचा पहिला दिवस. आई,आजी,काकू पटापट कामे उरकत होत्या. आम्हा मुलींनाही घरकामाचे धडे देण्यासाठी कांदा चीरणे वगैरे छोटीमोठी कामे त्या देत असत.       मला ही कामे मुळीच आवडत नसत. आईने मला मदतीला बोलावले की मी सपशेल नकार देई. त्या उमलत्या वयात मला कथा,कविता वगैरे लिहीण्याचा छंद जडला होता व मी सतत एका कोप-यात लिहीत बसे.       दीवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही मंदिरात जाऊन देवदर्शन करून आलो. आल्यावर फराळाची ताटे भरली गेली. फराळ खरोखरच चविष्ट होता. पाहुणे भरभरून स्तुती करीत होते.       काकूच्या सुरेखा आणि सरिता माझ्याच वयाच्या. आई,आजी,काकूला त्या फराळ बनवायला उत्साहाने मदत करीत. त्यामुळे आजी त्यांचं कौतुक करीत होती. मी काहीच मदत केली नसल्याने माझं कौतुक करण्याचा...

सखी

*स्वातीचे शब्दमोती*                  *सखी* शाळेमध्ये होती माझी मैत्रिण एक खास तीच अंतरी वसे सदोदित जणू ती माझा श्वास लाख जोडली नाती जीवनी  उणीव न कोठे उरते गं तरी शाळेमधले नाते अजुनी  मनात जागे होते गं  ||१|| कधी सांगावे कानी तिच्या मी प्रसंग काही घडलेले तिनेही चटकन उमजून घ्यावे गुपित अंतरी दडलेले प्रौढत्वाकडे झुकले आता वय हे वाढत जाते गं पण शाळेमधले नाते अजुनी  मनात जागे होते गं  ||२|| अभ्यासात ती थोडी मागे  फिकीर त्याची तिला नसे अव्वल नंबर माझा येता हर्ष बहू तिज होत असे हात घेउनी हाती माझा जल्लोष यशाचा करते गं शाळेमधले नाते अजुनी मनात जागे होते गं  ||३|| जन्मजन्मीचे ऋणानुबंध हे मन माझे ती वाचतसे उदास असता अंतरंगी मी ती नजरेने जाणतसे "सखी आज तू उदास का?",मज कुशीत घेउनी पुसते गं शाळेमधले नाते अजुनी मनात जागे होते गं  ||४|| गोडगोजिरी अशी साजिरी मैत्रिण माझी होती रुसवेफुगवे,अबोल्यातही गंमत मोठी होती आठव येता प्रिय सखीचा भूतकाळी मन रमते गं अन् शाळेमधले नाते अज...

निरोप

*स्वातीचे शब्दमोती*                          *निरोप* वेळ येता निरोपाची दु:ख दाटते मना परंतु त्यातच पुनर्भेटीचे गमक दडले ना ?  पुनर्भेटीची लावूनी आस देई मनास दिलासा निरोप असतो क्लेशकारक, तरीही हवाहवासा कन्या जाते सासुरासी निरोप पित्याचा घेई मिठीत घेऊनी डोळे पुसता ह्रदय हेलावून जाई संसार सुखाचा होवो त्यांचा ही पिता बाळगे आशा निरोप असतो क्लेशकारक, तरीही हवाहवासा लेक जातो उच्च शिक्षणा सोडूनी अपुला देश अभिमान मातेच्या ह्रदयी दाटे सोडवी मायेचे पाश होईल यशस्वी शिकूनी तेथे देते मनास दिलासा निरोप असतो क्लेशकारक, तरीही हवाहवासा बालपणीच्या सख्या भेटती अवचित एके दिवशी गूज मनीचे उलगडू लागते बसूनी त्यांच्यापाशी ह्रदय उचंबळे निरोप घेता परि लाभे मनास दिलासा निरोप असतो क्लेशकारक, तरीही हवाहवासा अखेरचा तो निरोप मात्र अती दु:खदायी सोडूनी जाता जिवलग कुणीतरी अश्रू अनावर होई एकरुप तो परमात्म्याशी नुरते काही पिपासा हा निरोप मात्र क्लेशकारक अन् वाटे नकोनकोसा !  © स्वाती शृंगार...