Posts

Showing posts from September, 2021

हरवलेले बालपण

 *स्वातीचे शब्दमोती* *हरवलेले बालपण* ओढाळ वेड्या मनामधला  स्वप्नांचा गाव जपलेला ह्रदयात  त्याचे बालपण नाव  आठवतात प्रत्येकाला  ते निरागस क्षण  खूप भावूक होतो  मग प्रत्येकजण  बालपणचे जग म्हणजे  बाबा नि आई अवघे विश्वच एकवटले  जणू त्यांच्या ठायी  मायेने ओथंबलेला  आजीचा हात करारी पण प्रेमळ  आजोबांची साथ दंगेखोर दादा आणि  क्षमाशील ताई शंभर गुन्हे माझे  हळूच पोटात घेई आठवते सोडलेली  पाण्यात कागदी नाव  अन् कोकणच्या मातीतला  आजोळचा गाव चिमणीच्या दाताने  तोडलेला खाऊ  भांडलो जरी कितीही  चटकन् एक होऊ शाळेतल्या दंगामस्तीचा  झुले मनात हिंदोळा मनाचा हळवा कोपरा  ती आठवणीतली शाळा बालपणीच्या आठवांना  ह्रदये अमुची भुलती  नयनामध्ये आसवांची  मग मौक्तिकफुले फुलती ©️स्वाती शृंगारपुरे  📞८६९२८९३९८४

संजीव

Image
 *स्वातीचे शब्दमोती*                     *संजीव* ह्या तीरावर वृक्ष मी अन् त्या तीरावर रुक्ष तू संथ वाहणा-या जलाची  साक्ष मी अन् साक्ष तू वाटसरूंना तीरावरल्या  देई निरंत मी छाया ठाम रहा तू मजपाठी अन् टाक दुरुन कटाक्ष तू हिरवाईने नटलेले  सृष्टीचे जणू मी लेणे  नटवाया मज हिरवाईने  कर मेघांना लक्ष्य तू वृक्ष मी जरी ईश्वराची  सजीव सुंदर कलाकृती  घन बरसवूनी ह्या सरितेमध्ये  मज "संजीव" करिसी प्रत्यक्ष तू!   ©️स्वाती शृंगारपुरे  📞८६९२८९३९८४