मा. समीर गुप्ते अभिष्टचिंतन
*स्वातीचे शब्दमोती* *अखिल भारतीय चां.का.प्रभू मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. समीर गुप्ते ह्यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...* *शुभदिन अभिष्टचिंतन* ज्ञातीजनांचा अभिमान तू ज्ञातीचा सन्मान तू युवकांचे जे आशास्थान त्या "नवनिर्माणाची" शान तू हरहुन्नरी नेता तू ज्ञातीजनांचा त्राता तू आधार आम्हा ज्याचा वाटे जणू कुटुंबातील पिता तू यशस्वी उद्योजक तू खाद्यसोहळ्याचा आयोजक तू ज्ञातीपरिषदा, चर्चासत्रे जनहित जपणारा संयोजक तू "समीर"म्हणजे शीतल वारा जो सर्वांना अतिसुखदायी तसाच वसावा आनंद तुझ्या जीवनी ठायी ठायी वरदहस्त असावा कुलदेवीचा बहरत राहो "यशोकीर्ती" अभिष्ट चिंतीती तुला निरंत हे "स्वातीचे शब्दमोती!" ©️स्वाती शृंगारपुरे बोरीवली मुंबई