आनंदसोहळा - डहाणू रामनवमी २०२४
*स्वातीचे शब्दमोती* *आनंदसोहळा* मन आतूर आतूर येता नवमीचा सण डपाप मंडळींच्या आले आनंदा उधाण लागे मातीची ती ओढ सारा जमेल गोतावळा रामरायाच्या जन्माचा होई आनंदसोहळा पारंपारिक आरत्या गाऊ भजन कवन जुळे आनंदाचा योग ऐकू गीतरामायण तृप्त मनाने घेऊया महाप्रसाद भोजन परतुनी जाऊ मग उर्जा नविन घेऊन पूर्वजांच्या संस्कारांचा मनी उमटला ठसा नव्या पिढीसाठी राहो हाच निरंत वारसा ! ©️ सौ.स्वाती सुबोध शृंगारपुरे बोरीवली, मुंबई 📞 8591325204