Posts

Showing posts from January, 2026

चित्र काव्य

Image
पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ  भाषा संवर्धन पंधरवडा  उपक्रम - चित्रकाव्य  दिनांक:१६/०१/२०२६ -सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे शीर्षक: सौभाग्याचा टिळा एक सुरेख देऊळ  मागे महाकाय वृक्ष  ईश्वराच्या अस्तित्वाची  जणू देतसे तो साक्ष वाहे बाजूने सरिता  लोक करितात स्नान  मायमाऊली विश्वाची  त्यांना करिते पावन स्नान करुनी नदीत  लोक राऊळात जाती  भक्तिभावाने नमुनी  देवा भजने ते गाती  वर शोभतो कळस  ईश्वराच्या त्या राऊळा जणू सरितेच्या भाळी शोभे सौभाग्याचा टिळा  स्वाती शृंगारपुरे 📞८५९१३ २५२०४

संदीप दादा वाढदिवस ६०

*प्रिय संदीप दादा,* तुझ्या साठाव्या वाढदिवसानिमित्त तुला माझ्याकडून ही काव्यरुपी भेट...  *षष्ट्यब्दीपूर्तीचा,आनंदाचा दिवस आज आला* *बहिण धाकटी आनंदाने अभिष्ट चिंतीते तुला!* *गोड साजिरा बालपणीचा काळ सुखाचा होता*  *दंगामस्ती केली किती पण वाद फुकाचा होता* *आठवणी त्या ताज्या जरीही काळ केवढा गेला* *बहिण धाकटी आनंदाने अभिष्ट चिंतीते तुला* *मिळो तुला जे जे उत्तम कधी काही न उणे पडो* *पूर्ण होवो सा-या इच्छा प्रियजनांचा सहवास घडो* *कुलदेवीचा सदैव लाभो वरदहस्त हा तुला* *बहिण धाकटी आनंदाने अभिष्ट चिंतीते तुला!* *हीरक महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*   *- ©️स्वाती* ०१/१०/२०२५ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹