Posts

Showing posts from October, 2018

सर्वेऽपि सुखिन: सन्तु

    *॥सर्वेऽपि सुखिनः सन्तु॥*      मंडळी ,  आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होतोय. शरद ऋतू हे निसर्गाला लाभलेलं लेणंच जणू ! नुकत्याच सरलेल्या वर्षा ऋतूत पाऊस पिऊन तृप्त झालेली ही सृष्टी सकाळच्या कोवळ्या उन्हात , दुपारच्या तप्त झळांत ,  संध्याकाळच्या अतिमंद तरीही सुखद गारव्यात तर रात्रीच्या टिपूर चांदण्यात आता न्हाऊन निघेल. अशा प्रसन्न वातावरणात होणारे देवीमातेचे आगमन सुखावह न ठरेल तरच नवल !      सर्वत्र आता देवीच्या भक्तीचा जागर सुरू होईल. देवीची रुपे तरी किती विविध ! कधी ती हाती त्रिशूल घेऊन दुष्टांचा संहार करणारी चंडीका बनते ,  तर कधी हाती वीणा घेऊन शुभ्रधवला शारदा होते... कधी सप्तशृंगासारख्या बिकट डोंगरमाथ्यावर जाऊन असुरांचा नायनाट करून तेथेच निद्रावस्थेत जाते तर कधी स्त्रीसुलभ हौसेनुसार अलंकाराने नटून तुळजापुरी वास्तव्यास जाते. कधी कंसमामासारख्या दुष्टांचा संहार करीत वीज बनून गडगडणारी विंद्याचलवासिनी बनते , तर कधी  खवळलेल्या दर्यात कोळी बांधवांचं रक्षण करणारी एकवीरा ! कधी माहुरगडची रेणूका तर कधी कोल्हापुरची महाल...