मोरू पोरका झाला
*स्वातीचे शब्दमोती* *मोरू पोरका झाला!* होय ! मोरू पोरका झाला ! मोरूच्या मावशीचा चेहरा हरपला... मावशी हे जग सोडून गेली... अवघ्या 63 व्या वर्षी मोरूच्या मावशीची प्राणज्योत मालवली... मावशी देवाघरी गेली... कदाचित् देवालाही हवी असेल निखळ करमणूक..... समस्त रसिकजनांसारखं त्यालाही वेड लावलं असेल मावशीच्या जिवंत आणि कसदार अभिनयानं... नाहीतर 63 हे काही जाण्याचं वय नव्हे. मराठी नाट्य-चित्रसृष्टीवर आज मोठा आघात झाला. सर्व मराठी रसिकजनांना दु:खाच्या खाईत लोटून सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय चव्हाण ह्यांनी आज जीवनाच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेतली. गिरणगावातील एका छोट्याशा चाळीत त्यांचे बालपण गेले. दादर इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करून रुपारेल महाविद्यालातून त्यांनी बीए ची पदवी संपादन केली. महाविद्यालयात असताना अनेक एकांकीकांमधून त्यांनी भूमिका केल्या. व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांनी अनेक नाटकांतून अभिनय केला व विनोदी अभिनेता ही त्यांची ओळख ठरली. श्रीमंत दामोदरपंत , टूरटूर , कार्टी प्रेमात...