Posts

Showing posts from November, 2020

एक फसलेली गजल

 गजल वृत्त - आनंदकंद लगावली - गागालगा लगागा गागालगा लगागा काळीज फाटले हे जेव्हा प्रहार केले माझ्याच माणसांनी ह्रदयात वार केले ते साधती अचुक हा माझ्यावरी निशाणा शब्दांत सोडलेले शर आरपार गेले का लागती असे घण आघात हे जिव्हारी मारावयास मजला धावून यार आले वाणीत गोड त्यांच्या भरली असे मिठाई कावे परंतु त्यांचे जळके निखार झाले मी ओळखू कसे ते त्यांचे खरे इरादे "स्वाती"स  आज कळले गद्दार यार झाले  - स्वाती शृंगारपुरे 8692893984

लाॅकडाऊन आणि मी

  विषय - लाॅकडाऊन आणि मी       लाॅकडाऊन म्हणजे आव्हान, संघर्ष !       पण वाईटातून चांगलं निघतं ह्या उक्तीची ह्याकाळात प्रचिती आली.      लाॅकडाऊनमुळे माझ्या क्षमता मला कळल्या. सुरुवातीला अशक्यप्राय वाटलेली धुणीभांडी, केरकचरा ही कामं आता तितकीशी कठीण वाटत नाहीत. वेळेचं काटेकोर नियोजन केल्यामुळे स्वत:साठी वेळ मिळू लागला. रोज घरचं ताजं जेवण जेवल्यामुळे सर्वांच्या तब्येतीही स्वस्थ आणि मस्त आहेत. पिझ्झा,मॅगीच्या विळख्यात सापडलेल्या मुलांना आईच्या हातचे पदार्थ अधिक रुचकर वाटू लागले .       "घरीच तर असतेस,काम काय असतं तुला?"ह्या नवरोजींच्या प्रश्नाला आता उत्तर मिळत आहे. माझा कामाचा आवाका आणि उरक बघून त्यांच्या डोळ्यात तरळणारी अभिमानाची छटा मला सुखावून जाते.       पटापट कामं उरकत असताना स्वैपाकघराच्या खिडकीतून समोरच्या झाडावर चाललेला चिमण्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करतो.       ह्या लाॅकडाऊनने मला जसं कठीण परिस्थितीवर मात करायला शिकवलं तसंच नात्यांचीही नव्याने ओळख करून दिली. चटकन...