चित्र काव्य
पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ
भाषा संवर्धन पंधरवडा
उपक्रम - चित्रकाव्य
दिनांक:१६/०१/२०२६
-सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे
शीर्षक: सौभाग्याचा टिळा
एक सुरेख देऊळ
मागे महाकाय वृक्ष
ईश्वराच्या अस्तित्वाची
जणू देतसे तो साक्ष
वाहे बाजूने सरिता
लोक करितात स्नान
मायमाऊली विश्वाची
त्यांना करिते पावन
स्नान करुनी नदीत
लोक राऊळात जाती
भक्तिभावाने नमुनी
देवा भजने ते गाती
वर शोभतो कळस
ईश्वराच्या त्या राऊळा
जणू सरितेच्या भाळी
शोभे सौभाग्याचा टिळा
स्वाती शृंगारपुरे
📞८५९१३ २५२०४
Comments
Post a Comment