संदीप दादा वाढदिवस ६०

*प्रिय संदीप दादा,*

तुझ्या साठाव्या वाढदिवसानिमित्त तुला माझ्याकडून ही काव्यरुपी भेट... 

*षष्ट्यब्दीपूर्तीचा,आनंदाचा दिवस आज आला*
*बहिण धाकटी आनंदाने अभिष्ट चिंतीते तुला!*

*गोड साजिरा बालपणीचा काळ सुखाचा होता* 
*दंगामस्ती केली किती पण वाद फुकाचा होता*
*आठवणी त्या ताज्या जरीही काळ केवढा गेला*
*बहिण धाकटी आनंदाने अभिष्ट चिंतीते तुला*

*मिळो तुला जे जे उत्तम कधी काही न उणे पडो*
*पूर्ण होवो सा-या इच्छा प्रियजनांचा सहवास घडो*
*कुलदेवीचा सदैव लाभो वरदहस्त हा तुला*
*बहिण धाकटी आनंदाने अभिष्ट चिंतीते तुला!*


*हीरक महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
 
*- ©️स्वाती*
०१/१०/२०२५

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं