गुरुदेव दत्त

*माझी कन्या*

लाडकी गुणाची 
माझी कन्या एक 
जणू माझीच प्रतिकृती 
शोभे माझी लेक 

समजती तिजला 
माझिया मनीचे भाव 
मनात शिरुनी माझ्या 
घेई मनाचा ठाव 

सावलीसारखी नेहमी 
असते अवतीभवती 
वाटे मजला जणू मनीच्या 
शिशिरातील मधुमास ती 

रुप सृष्टीचे विहंगम जसे 
झुळझुळणारा झरा 
तिच्या रुपाने घरात आला 
जणू हासरा तारा 

नभांगणीची घरात माझ्या 
अवतरली तारकादळे 
अबोल माझ्या ओठांमधले 
गुपित तिजला कळे 

धावत येऊनी गळ्यात टाकुनी 
मायेचा करपाश 
विचारते मज "आई,आज तू
उदास दिसशी कश्यास?"

लाडकी लेक बाबांची 
अन् भावाची प्रेमळ ताई
गोड तिच्या हास्याने अवघे 
घरदार भरून जाई 

अशी गुणाची कन्या माझी 
जणू अस्मानीची परी 
गाजवी सत्ता गोडगोजिरी 
अमुच्या ह्रदयावरी ! 

-©️ सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे 
 ०१/११/२०१५
📞८५९१३ २५२०४

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं