बालकविता - मज्जा

*बालकविता*

शीर्षक - मज्जा 
  कवयित्री - स्वाती शृंगारपुरे 

नको ना गं आई मला अभ्यासाला बसवू 
गोड गोड खाऊचे आमिष दाखवून फसवू

शाळेमध्ये टीचर देतात खूप खूप होमवर्क 
सांग बरं तुला त्याने काय पडतो फरक ? 

लिहून लिहून आई माझे हात येतात दुखून 
घोकंपट्ट्या करून करून घसा जातो सुकून

हॅन्डरायटींग आलं पाहिजे छान वळणदार 
नोटबुक वर मिळायला हवा रोज रोज स्टार

पण आता आहे आई मला दिवाळीची सुट्टी 
अभ्यासाशी कट्टी आणि आरामाशी बट्टी 

सुट्टीमध्ये आई माझी पुरव सारी हौस 
एकसारखा अभ्यासाचा तगादा नको लावूस 

छान छान बंदूक आणि फटाके घेऊ
राणीच्या बागेत फिरायलाही जाऊ 

दे शेव चकली लाडू, दे आईस्क्रीम आणि पिझ्झा
सुट्टीमध्ये करुया गं खूप खूप मज्जा 

 - सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे 
भ्रमणध्वनी: ८५९१३ २५२०४

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं