नणंद सीमा कर्णिक हिच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त
माहेरचा मान सासरचा सन्मान
सीमा म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा अभिमान
आदर्श कन्या आणि प्रेमळ snusha
नणंद जरी नात्याने तरी बहीणच नणंदेपेक्षा
ती मांगल्याची मूर्त ती समईची ज्योत
कधी राही न ती दुःखी सदा आनंदाचा स्रोत
तिला ठाऊकही नसे कधी रुसवा फुगवा
क्षण प्रत्येकच तिने छान आनंदी करावा
सदा टापटीप असे आहे सुंदर देखणी
गुण तिचे गाण्यासाठी उणी माझी हो लेखणी
एक देवाला प्रार्थना पुरवी तिच्या मनकामना
आयु आरोग्यही लाभो सुख लाभो जीवना
Comments
Post a Comment