सखी मंगला जाधव हिच्या निवृत्ती सोहळ्याकरिता

प्रिय सखी मंगल.. म्हणजेच आमची लाडकी मॅगी 

निवृत्तीचा दिन सोन्याचा आज असे हा आला 
आनंदाने प्रिय सखी गं शुभकामना ह्या तुला

गोडगोजिरी अशी साजिरी प्रिय सखी तू छान 
मैत्रीपुढती कधी न दाविसी खुर्चीचा अभिमान 
संकटसमयी कधी न सोडीसी तू माझी साथ 
सदैव असे गं माझ्या पाठी मदतीचा तव हात 
अंतरी जपसी सदैव सखे तू  गुरुभजनाची माला 
आनंदाने प्रिय सखी गं शुभकामना ह्या तुला 

निवृत्ती ही नाममात्र हा नसे अंत कार्याचा 
हा तर दुसरा टप्पा आता मनासारखे जगण्याचा 
मिळो तुला जे जे उत्तम कधी काही न उणे पडो 
लाभो आयु, आरोग्य अन् प्रियजनांचा सहवास घडो 
कुलदैवताचा सदैव लाभो वरदहस्त हा तुला 
आनंदाने प्रिय सखी गं शुभकामना ह्या तुला! 

 - ©️स्वाती शृंगारपुरे 
85913 25204

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं