डहाणू रामनवमीसाठी

*स्वातीचे शब्दमोती*

                      *ओढ*

ओढ लागली डहाणू ची 
नातलगांच्या भेटीची 
श्रीरामाचा जन्मसोहळा
ही ओढ गावच्या मातीची ! 

चला चला हो त्वरा करा 
रामनामाचा गजर करा 
मुंबई, नाशिक, पुणेकरांनो 
डहाणू ची ही वाट धरा

सोबत घेऊ नवी पिढी 
शिकवू त्यांना चाली, रुढी 
मनांत त्यांच्या चला उभारू 
परंपरांची उंच गुढी


घेऊ आप्तांच्या गाठी 
जीवलग नात्यांच्या भेटी
साठवूया सळसळती उर्जा 
जगणे सुंदर करण्यासाठी !

©️ सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे 
दि. ०५/०४/२०२५

📱 ८५९१३ २५२०४

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं