सहवास आठवणींचा

 

विषयः सहवास आठवणींचा 

शीर्षक : जीवन झाले गाणे 

ओळी २४ 

दिनांक  : २३/१२/२०२३


तुझ्या माझ्या प्रेमाचे 

       आठवती जेव्हा धागे

भावूक होऊन मन जाते 

         भूतकाळात मागे


तुझ्या माझ्या भेटी व्हायच्या 

        रम्य तळ्याकाठी 

आतुरलेले प्रेमी जीव

       त्या गोड भेटींसाठी 


तळ्याकाठचा डवरलेला 

        गंधाळलेला प्राजक्त 

तुझे सूचक बोलणे

        अन् माझे गाल आरक्त


तळ्याकाठी खुलून येत 

       स्वप्नांचे रंग

आनंदाच्या हिंदोळ्यावर 

       झुलण्यात दोघे दंग 


जीवन झाले गाणे 

        आणि सुख आले दारी 

तळ्याकाठची स्वप्ने आपली 

        साकार झाली सारी


सरून गेले अल्लड दिन ते 

    संसारही ना राहिला नवा 

वृद्धत्वाकडे झुकताना पण 

      आठवणींचा सहवास हवा ! 



सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे 

बोरीवली, मुंबई 


भ्रमणध्वनी : ८५९१३ २५२०४

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं