अमोल गोले ह्यांच्या आजीआजोबांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त

 प्रिय आजी आजोबा


*शुभदिन अभिष्टचिंतन*



आरूढ होऊनी झोके घेता

     सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर 

कशी कळेना बघताबघता

    सरली पहा ही वर्षे सत्तर


कधी उन्हाची तप्त काहिली

     असेल तुम्ही जरी साहिली

तसाच सोसाट्याचा वारा

     उडवून लावी स्वप्नपिसारा


तरीही त्यातूनी मार्ग काढूनी

     बहरले तुमचे सहजीवन

मुला-नातवंडांच्या साथीने

     घरात फुलले जणू नंदनवन


कधी कटू तर कधी गोड ही

     आठवणींची साखळी

असेल उराशी बाळगलेली

     करा आज ती मोकळी


सहजीवनातील आज आठवा

     आनंदाचा प्रवास सारा

अशीच अखंड वाहत राहो

     सुखमय तुमची प्रपंचधारा 


नातवंडांच्या लाख शुभेच्छा

     जीवन तुमचे राहो आबाद 

सदैव राहो अमुच्या पाठी

     एकच तुमचा आशिर्वाद !



-©️ स्वाती शृंगारपुरे

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं