कवितेच्या जगात



संस्कृती चांकाप्र महिला मंडळ आयोजित  काव्यलेखन उपक्रम

दि. 14/10/2022

          *कवितेच्या जगात*


कवितेच्या जगात कवी असतो राजा

काव्यप्रेमी रसिक हीच त्याची प्रजा


कवितेच्या जगात झुळझुळणारे झरे

हिरवीगार राने अन् मंद मंद वारे


कवितेच्या जगात सूर्य, चंद्र, तारे

लेखणीत कवीच्या सामावती सारे


कवितेच्या जगात लय,ताल,नाद 

भावनांच्या आवेगाला हळूच घालती साद


रसिकहो, चला सारे रंगूया ह्या रंगात 

सैर करू आनंदाने कवितेच्या जगात! 


©️ स्वाती शृंगारपुरे

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं