संस्कृती चांकाप्र महिला मंडळ अध्यक्षा रुपाताई देशमुख ह्यांच्या गौरवार्थ

 प्रिय रुपाताई 


जीवनगौरव पुरस्कार हा क्षण असीम आनंदाचा

स्वीकार करावा काव्यरूपी ह्या अमुच्या शुभेच्छांचा


शालीन,सोज्ज्वळ रुप असे हे सार्थ ठरविले नाव "रुपा"

अमृतरुपी ही "सुधा" पाझरे भगवंताची जणू कृपा


ओठांवरती नित्य हसू अन् ह्रदयी अपार माया वसे

सर्व सख्यांवर सदा धरीली वात्सल्याची छाया असे


करारीबाणा कामाकरिता, अध्यक्षपदाचा ठेवती मान

विनम्रताही भिनली ठायी सर्व सख्यांना मानती समान 


कधी विणावी सुरेख गोधडी कधी करावा बाळंतविडा 

सुंदर चित्रे कधी रेखावी कधी रांगोळीचा मोहक सडा


कलागुण हे विविध अंगी पाककृती अवगत नाना 

अगत्य तुमचे असे दांडगे तृप्त करी सर्वांची रसना


जीवनगौरव तुमचा होता हर्ष होई आमुच्या मना

अभिमानाने तुम्हांस अमुची ही असे मानवंदना 


सर्व सख्यांच्या लाख शुभेच्छा जीवन तुमचे राहो आबाद 

सदैव राहो अमुच्या पाठी एकच तुमचा आशिर्वाद!



Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं