सहवास कवितेचा

 *सहवास कवितेचा*


होतो चहूकडे मज आभास कवितेचा 

माझ्या मनास जडला हा ध्यास कवितेचा 


रुजते मनात माझ्या सदैव माझी कविता 

झरतो लेखणीतून अभ्यास कवितेचा 


गूज अंतरीचे,  शब्दांत फुलते माझ्या 

प्रत्येक श्वास माझा जणू शब्द कवितेचा 


अविरत जैसे चाले हे चक्र निसर्गाचे

तसाच निरंत चालो हा प्रवास कवितेचा 


राहो सदैव बनुनी कविताच माझी सखी 

"स्वाती"स सदैव लाभो सहवास कवितेचा

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं