आयुष्याला सावरावे

 *आयुष्याला सावरावे*


मोह नसावा संपत्तीचा 

     मनास आता आवरावे 

कठीण असले जगणे तरीही 

     आयुष्याला सावरावे


हसू असावे ओठांवर जरी

     कितीही संकटे आली

परतवुनी त्यांना निर्धाराने 

     आनंदाच्या वहा पखाली 


सेवा करुनी मायपित्यांची 

     सदा नमावे त्या चरणी 

सदा रहावे लीन,नम्र अन्

     गोड असावी ती वाणी 


निसर्गनीती झुगारून ह्या 

     सृष्टीवरती नकोत वार 

कोसळत्या जलधारांसंगे 

     फुलून येऊ दे शेतशिवार 


घास सुखाचा मुखी पडावा 

    पाप कराया बावरावे 

ईश्वरचरणी झुकवून माथा 

     आयुष्याला सावरावे

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं