जीवन एक संघर्ष
*जीवन एक संघर्ष*
जन्मापासून मृत्युपर्यंत
वर्षामागून वर्ष सारे
सोपे नाही जगणे येथे
जीवन एक संघर्ष ठरे
पोटासाठी धडपड करणे
कुणास चुकले नाही
भूक विखारी पोटामधली
निश्चिंत बसू ना देई
कसे कुणाचे प्राक्तन येथे
भविष्य घडवित जाई
संघर्षातून जीवनाच्या
कुणास सुटका नाही
संघर्षाच्या वाटेवरती
पदोपदी हे काटे
ह्रदयात निखारे तप्त कधी
अन् मनात खिन्नता दाटे
परंतु, संघर्षावीण जीवनाला
नसे काही अर्थ
संघर्षातून जीवन घडते
म्हणू नका त्यासी व्यर्थ!
Comments
Post a Comment