वाईन आख्यान

 *स्वातीचे शब्दमोती*


         *वाईन आख्यान* 


कसं काय मंडळी 

आहात ना सारे fine ?

सुपर मार्केट ला मिळणार 

आता म्हणे wine ! 


आम्ही जातो शाॅपिंगला 

व्हा आम्हाला join

चला चला लवकर

तिथे असेल मोठी line


शाॅपिंग करा भरपूर 

मार्केट खुले नाईन टू nine

हे तर माॅडर्न कल्चर

ही नव्हे तुमची decline



वाईन नसते स्ट्राँग 

ही तर आहे benign 

अज्जिबात लाजू नका

ताठ ठेवा spine


"घेत नाही मी" म्हणत 

मारू नका shine 

अहो, ही नव्हे दारू

ही तर फक्त wine

ही तर फक्त wine ! 


©️स्वाती शृंगारपुरे

01 फेब्रुवारी 2022

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं