संजीव
*स्वातीचे शब्दमोती*
*संजीव*
ह्या तीरावर वृक्ष मी
अन् त्या तीरावर रुक्ष तू
संथ वाहणा-या जलाची
साक्ष मी अन् साक्ष तू
वाटसरूंना तीरावरल्या
देई निरंत मी छाया
ठाम रहा तू मजपाठी अन्
टाक दुरुन कटाक्ष तू
हिरवाईने नटलेले
सृष्टीचे जणू मी लेणे
नटवाया मज हिरवाईने
कर मेघांना लक्ष्य तू
वृक्ष मी जरी ईश्वराची
सजीव सुंदर कलाकृती
घन बरसवूनी ह्या सरितेमध्ये
मज "संजीव" करिसी प्रत्यक्ष तू!
©️स्वाती शृंगारपुरे
📞८६९२८९३९८४

Comments
Post a Comment