ज्ञान दे मज बुद्धीसागरा
*ज्ञान दे मज बुद्धी सागरा*
दूर करुनी अज्ञान माझे
ज्ञानरुपी प्रकाश दे
ज्ञान दे मज बुद्धीसागरा
तव भक्तीची आस दे ||१||
नको वासना विषयाची मज
भोगविलासी वृत्ती नको
कळावया गुरुची महती
उपासनेचा ध्यास दे ||२||
ज्ञान असे दे दयाघना
इतरांची मज पीडा कळो
पीडा हराया दु:खी जनांची
ह्रदयात तुझा अधिवास दे ||३||
ज्ञान दे मज बुद्धीसागरा
पर्यावरणा जपण्याचे
हिरवाईने बहरून सृष्टी
चिऊ काऊ ला निवास दे ||४||
शब्दांमध्ये अर्थ असावा
काव्य फुलावे त्यांमधुनी
काव्यानंदा लुटणा-या त्या
रसिकांचा सहवास दे! ||५||
Comments
Post a Comment