पर्यावरण



               *पर्यावरण*


सावध व्हा रे चराचरांनो,ऐका भविष्यातल्या हाका

पर्यावरण हे कवच पृथ्वीचे कधीच भेदू नका


डोंगर अडविती मेघांना अन् बरसे पाऊसपाणी 

हिरवाईने डोले मग ही सुकुमार सृष्टीराणी 

परी डोंगर फोडुनी त्यातुनी रस्ता बनवी मानव 

काय म्हणावे स्वार्थाला ह्या, मानव की दानव? 

पर्वतराजी उपकारक तीस सुरूंग लावू नका 

पर्यावरण हे कवच पृथ्वीचे कधीच भेदू नका


झाडे देती छाया अन् बांधिती घरटे पक्षी

फुलाफळांनी निसर्ग रेखी जणू झाडावरती नक्षी

पुरविती झाडे प्राणवायूही तुम्हांस जगण्याला 

हाय! तुम्ही रे तोडुनी झाडे घात स्वतः चा केला

नकाच तोडू झाडे वेली, द्या उमलू त्यावर कलिका 

पर्यावरण हे कवच पृथ्वीचे कधीच भेदू नका


ऐका श्रोते तुम्हा सांगते मार्ग एक सोपा

रक्षण करण्या पृथ्वीचे पर्यावरण मूलमंत्र जपा 

स्वतः च स्वतः वर ठेवा ताबा राखा आरोग्य 

जीवन जगण्या आनंदाने हवे पर्यावरण योग्य 

सृष्टीच्या त्या सौंदर्याला लावू नका रे धक्का 

पर्यावरण हे कवच पृथ्वीचे कधीच भेदू नका 


Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं