तुझ्याविना
- Get link
- X
- Other Apps
कविता शीर्षक- तुझ्याविना
(परदेशी असलेल्या मुलाच्या आईची व्यथा
ओळी-16)
लेकरा रे तुझ्याविना घर वाटे सुनेसुने
अश्रू आईच्या नयनी बाळा तुझ्या विरहाने
परदेशी राहूनी तू झाला मोठा अधिकारी
हात जोडूनी उभी सारी सुखे तुझ्या दारी
प्रेमळ ती पत्नी आणि गोजिरवाणी मुले
परदेशात सुखाने तुझा संसारही फुले
इथे घरात आईचे मात्र मन हे उदास
नातवंडांच्या भेटीची मज लागली रे आस
नको मला बाळा काही आता उतारवयात
सापडेन आता केव्हाही मी यमाच्या फे-यात
रोज दारात येऊन तुझी पाहते मी वाट
कधी होईल रे घरी तुझ्या स्वागताचा थाट
तुझ्याविना ह्या घराचा उंबराही भासे सुना
गेले सुकून अंगण नाही बहर फुलांना
कधी उजळेल सांग पुन्हा घराचा उंबरा
तुझ्याविना ह्या घराचा रिता कोपरा कोपरा !
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment