पाऊस-मनात साठलेला



           *पाऊस-मनात साठलेला*


बालपणीचा पाऊस मला हवाहवासा वाटायचा

चिमुकल्या माझ्या छत्रीवर थेंबाथेंबाने साठायचा


हळूच छत्री भिरकावून मी नाचे साचल्या पाण्यात

आणि पाऊस बरसे माझ्या ओठांवरल्या गाण्यात


तारुण्यात पाऊस मात्र अंग अंग भिजवायचा

भिजवतानाच डोळ्यांत माझ्या रंगीत स्वप्न सजवायचा


एका छत्रीत दोघे आम्ही पाऊस खट्याळ तेव्हा वाटायचा

धुंवाधार बरसून माझ्या अंगोपांगी दाटायचा


प्रौढत्वात आता पाऊस जबाबदा-यांनी वाकलाय

खूप बरसायचं असूनसुद्धा  बंधनांमध्ये झाकलाय


सांजवेळी पण जीवनाच्या सुखावणारा असेल वारा

इंद्रधनूचे रंग मनी अन् संतृप्तीच्या रिमझिमधारा !


Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं