आई

 

*प्रिय आईस*

आठवाने तुझ्या माझे मन व्याकूळ होई
सारे काही आहे परंतु, नाही माझी आई

बालपणी शिकवायचीस तूच श्रीगणेशा
दीप लावूनी ज्ञानाचे उजळल्यास माझ्या दिशा

स्पर्शामध्ये तुझ्या होती विश्वामधली शांती
कुशीत तुझ्या शिरता,आम्हा नसे कसलीच भिती

आई म्हणजे देवापुढल्या समईची ज्योत
निर्मळ आणि प्रेमळ असा मांगल्याचा स्त्रोत

बाबांना गवसलेला संसाराचा सूर
आणि लेकरांसाठी आई म्हणजे मायेचा महापूर

आठवतो अजूनही तो चिऊ काऊ चा घास
अमृताची गोडी त्याला सात्विकतेचा सुवास

आमच्या पिल्लांचंही ते सुरक्षित घरटं
आजीसोबत नातवंडांचं जमायचं साटंलोटं

तुझ्याच संस्कारांचा ठेवा तू नसताना जपत आहोत
उरामध्ये लपवून दु:ख सुखाचे चांदणे शिंपत आहोत

जीवन सारे नीरस वाटते जगातून तू जाता
विखुरले माझे शब्दमोती, विदीर्ण झाली कविता!


Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं