माती पाणी आकाश

 *स्वातीचे शब्दमोती*


         *माती-पाणी-आकाश*


माती-पाणी-आकाश


ऊन वारा मेघ ह्यांच्या संगे बहरतं

माती-पाणी-आकाशाचं आहे जुनं नातं


काळी सावळीच माती तिच्या मायेला ये पूर

कुशीमध्ये तिच्या येई बीजाला अंकूर


एकलीच माती कशी वाहते हा भार

खळखळत्या पाण्याचा तिला असे हो आधार


पाणी मुरता मातीत बीजा फुटती धुमारे

आकाशही देई बीजा ऊन आणि वारे


मेघ जमती आकाशी जणू भरे त्यांची शाळा

जेव्हा सुटते  ती शाळा सरी येती भराभरा


तेव्हा भरुन वाहती नद्या,विहीरी नि तळी

हवे काय आणखी मग फुलावया कळी ?


मेघा सारुनिया दूर हळू डोकावे अरुण

चिमुकल्या कळीसाठी पाठवे तो ऊन


थंडगार वाहे वारा ऊन्हा करुनिया दूर

गंध उधळे सर्वत्र कळी होऊनिया फूल


असे निसर्गाचे चक्र गोल फिरते निरंत

कारण माती-पाणी-आकाशाचं आहे जुनं नातं


 


Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं