एक फसलेली गजल
गजल
वृत्त - आनंदकंद
लगावली - गागालगा लगागा गागालगा लगागा
काळीज फाटले हे जेव्हा प्रहार केले
माझ्याच माणसांनी ह्रदयात वार केले
ते साधती अचुक हा माझ्यावरी निशाणा
शब्दांत सोडलेले शर आरपार गेले
का लागती असे घण आघात हे जिव्हारी
मारावयास मजला धावून यार आले
वाणीत गोड त्यांच्या भरली असे मिठाई
कावे परंतु त्यांचे जळके निखार झाले
मी ओळखू कसे ते त्यांचे खरे इरादे
"स्वाती"स आज कळले गद्दार यार झाले
- स्वाती शृंगारपुरे
8692893984
Comments
Post a Comment