शाळा सुरू

एक जुना लेख

१ ७ जुन ! सुट्टी संपली. शाळा सुरु झाल्या. मित्रांनो, चला …………
मुलांसोबत आपणही अनुभवूया आपले शाळेचे सुंदर दिवस !
नवा युनिफोर्म , नविन दप्तर , वह्या , पुस्तकं ,डबा , बाटली ,रंगीबेरंगी रेनकोट ………….
छोटया मंडळींची सगळी खरेदी एव्हाना झालीच असेल. चला तर मग ………
लागूया आता आपणही कामाला. घालून देऊया त्यांच्या पुस्तकांना कव्हरं . लेबलदेखील
लावूया वर छान छान . दप्तर भरायला आपल्या सोनुल्यांना मदत करताना हळूच आपणही
घेऊया कोऱ्या पुस्तकांचा धुंद गंध ! हरवून जावूया आपल्याही बालपणीच्या आठवणींमध्ये !
आठवडया अखेरीस हळूहळू अभ्यासाला सुरुवात होईलच! तोपर्यंत नवीन टीचर, नवे जुने
फ्रेंड्स ………। बच्चे कंपनीचं बस्तान बसलेलं असेलच .नव्या वर्गातल्या गमतीजमती सांगण्यात आणि कौतुकाने त्या ऐकण्यात आईचा आणि बाळाचा दिवस संपत असेल. मदत करूया आता त्यांना त्यांच्या
अभ्यासात . त्यांना शिकवता शिकवता आपल्याही लक्षात येतील कदाचित त्याकाळात न
समजलेली अवघड गणिते ,इंग्रजीतली स्पेल्लीन्ग्स , भूगोलातले नकाशे आणि इतरही
बरेच काही ! आठवतील आपल्याला आपले रम्य दिवस .
चल तर मग ! घडवूया उद्याच्या भारत देशाचे नवे शिल्पकार !!!
नव्या शालेय वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा …… सर्व मुलांना आणि त्यांच्या आई बाबांना सुद्धा !!!!

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं