कोणे एके काळी
*स्वातीचे शब्दमोती*
*कोणे एके काळी*
कोणे एके काळी लोक समाधानात राहायचे
दिवेलागणीस म्हणे इथे 'शुभंकरोति' व्हायचे !
काळ होता जुना, तेव्हा घरात फोन नसायचे
घरामध्ये सारेजण गप्पा मारीत बसायचे
झोपाळ्यावर बसून मुले म्हणायची पर्वचा
मुखोद्गत असत त्यांना श्लोक,आर्या,ऋचा
मोठ्या कुटुंबात सारे एकोप्याने राहायचे
दिवेलागणीस म्हणे इथे 'शुभंकरोति' व्हायचे
मध्यम होता व्यापार अन् उत्तम होती शेती
प्रदुषण नव्हते म्हणून कसदार काळी माती
अपार मेहनतीने शेतात पिकत धान्यमोती
श्रीमंती नव्हती तरी सुबत्ता मात्र होती
आनंदाने उत्साहाने सण साजरे व्हायचे
दिवेलागणीस म्हणे इथे 'शुभंकरोति' व्हायचे
मोठ्या घराभोवती असती वृक्ष, वेली, फुले
आजीआजोबांच्या मायेत वाढत होती मुले
आत्या काका काकी प्रेमाची सावली धरती
गुण्यागोविंदाने सारी एकत्रच नांदती
सख्खे-चुलत भेद नव्हता सलोख्याने राहायचे
दिवेलागणीस म्हणे इथे 'शुभंकरोति'व्हायचे
गेले ते दिवस काळ बदलत गेला जसा
स्वतंत्रच संसार आता वाटू लागला हवासा
पैसा झाला मोठा अन् बदलून गेले जीवन
पिझ्झा नि बर्गर खाऊन साजरे होतात सण
पाळणाघरात सरून जाते दिवेलागणीची वेळ
कसा साधूया आता 'शुभंकरोति'चा मेळ ??
© स्वाती शृंगारपुरे
24/01/2019
📞८६९२८९३९८४
*कोणे एके काळी*
कोणे एके काळी लोक समाधानात राहायचे
दिवेलागणीस म्हणे इथे 'शुभंकरोति' व्हायचे !
काळ होता जुना, तेव्हा घरात फोन नसायचे
घरामध्ये सारेजण गप्पा मारीत बसायचे
झोपाळ्यावर बसून मुले म्हणायची पर्वचा
मुखोद्गत असत त्यांना श्लोक,आर्या,ऋचा
मोठ्या कुटुंबात सारे एकोप्याने राहायचे
दिवेलागणीस म्हणे इथे 'शुभंकरोति' व्हायचे
मध्यम होता व्यापार अन् उत्तम होती शेती
प्रदुषण नव्हते म्हणून कसदार काळी माती
अपार मेहनतीने शेतात पिकत धान्यमोती
श्रीमंती नव्हती तरी सुबत्ता मात्र होती
आनंदाने उत्साहाने सण साजरे व्हायचे
दिवेलागणीस म्हणे इथे 'शुभंकरोति' व्हायचे
मोठ्या घराभोवती असती वृक्ष, वेली, फुले
आजीआजोबांच्या मायेत वाढत होती मुले
आत्या काका काकी प्रेमाची सावली धरती
गुण्यागोविंदाने सारी एकत्रच नांदती
सख्खे-चुलत भेद नव्हता सलोख्याने राहायचे
दिवेलागणीस म्हणे इथे 'शुभंकरोति'व्हायचे
गेले ते दिवस काळ बदलत गेला जसा
स्वतंत्रच संसार आता वाटू लागला हवासा
पैसा झाला मोठा अन् बदलून गेले जीवन
पिझ्झा नि बर्गर खाऊन साजरे होतात सण
पाळणाघरात सरून जाते दिवेलागणीची वेळ
कसा साधूया आता 'शुभंकरोति'चा मेळ ??
© स्वाती शृंगारपुरे
24/01/2019
📞८६९२८९३९८४
Comments
Post a Comment