स्वागतगान

 *स्वातीचे शब्दमोती*

गगनावर पसरून निलिमा
दिव्य आपुल्या किरणांचा
रविराज निघती भूवरी
मुकुट लेवूनी सोन्याचा

पहाटचा तो शीतल वारा
तृषार्त धरणीस सांगी
दवबिंदूचे मोती झेलूनी
मिरव तू अंगोपांगी

लेवूनी हिरवाईचा साज
वृक्षराज तो पाही वाट
अवखळ त्या किरणांची मजवर
होईल कधी सुखकर बरसात

झाडावरी बैसून कुठेसे
कोकिळ घेई मंजुळ तान
रविराजाच्या स्वागतास जणू
गाई मंगल स्वागतगान

उधळीत केशर नभांगणावर
नाजूक सोनेरी
क्षितिजावरती हळूच अवतरे
अरुणाची स्वारी !

© स्वाती शृंगारपुरे
📞 8692893984

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं