घर तुझं नि माझं

घर तुझं नि माझं
हिरवाईने नटलेलं
आभाळ होऊन तुझ्यामाझ्या
ह्रदयामध्ये दाटलेलं

घर तुझं नि माझं
तू राजा अन् मी राणी
प्रेमात भिजावे चिंब अन्
गावी आनंदाची गाणी

घर तुझं नि माझं जणू
मायेचा ओलावा
स्वप्नातल्या संसाराचा
पापण्यांत जपलेला ठेवा

घर तुझं नि माझं
जणू प्रेमभरली मिठी
निसटलेल्या क्षणांना
कवेत घेण्यासाठी !

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं