तू नसताना
*स्वातीचे शब्दमोती*
*तू नसताना*
तू नसताना व्याकूळ मन हे तुझ्या आठवाने
तू नसताना अफाट जग हे वाटे सुनेसुने
एकमेकांवाचून अपुले अस्तित्व कधी नव्हते
अंतरी माझ्या तूच सदोदित मी तुलाच अनुभवते
नसताना तू जगरहाटी सुरळीत चालू असते रे
ह्रदयमंदिरी माझ्या परंतु तुझीच मूर्ती वसते रे
तू नसताना छळतो मजला माझा भूतकाळ
नयनांतून मग आसवांची वाहे मौक्तिकमाळ
तू नसताना वाटे मज जणू जीवन संपले सारे
शोक अनावर मनात दाटे ह्रदयी वादळवारे
©स्वाती शृंगारपुरे
8692893984
*तू नसताना*
तू नसताना व्याकूळ मन हे तुझ्या आठवाने
तू नसताना अफाट जग हे वाटे सुनेसुने
एकमेकांवाचून अपुले अस्तित्व कधी नव्हते
अंतरी माझ्या तूच सदोदित मी तुलाच अनुभवते
नसताना तू जगरहाटी सुरळीत चालू असते रे
ह्रदयमंदिरी माझ्या परंतु तुझीच मूर्ती वसते रे
तू नसताना छळतो मजला माझा भूतकाळ
नयनांतून मग आसवांची वाहे मौक्तिकमाळ
तू नसताना वाटे मज जणू जीवन संपले सारे
शोक अनावर मनात दाटे ह्रदयी वादळवारे
©स्वाती शृंगारपुरे
8692893984
Comments
Post a Comment