दुधावरची साय

*स्वातीचे शब्दमोती*

        *दुधावरची साय*

नातं "ती"चं नी माझं
असे एक अपुर्वाई
गोड तिच्या हास्याने माझे
घरदार भरून जाई

गाल गोबरे जणू सायीचे
मऊ मुलायम कांती
ऐटीत बसली मांडीवर अन्
पाहे हसून सभोवती

नभांगणातून जणू उतरली
ही शुक्राची चांदणी
अविरत पेरित हास्य गातसे
मंजुळ बडबडगाणी

कधी बोलते आई आई
कधी बोलते बाबा
नजरेने पण मलाच खुणवी
घ्या मज आजोबा

चला जाऊया भूर फिराया
उचलूनी घ्या मज घट्ट
आनंदाने मीही तिचा मग
पुरवित जातो हट्ट

तिचे नि माझे असे वेगळे
एक अनोखे राज्य
राजकुमारी ती राज्याची अन्
मी सेवेस सज्ज

माया अपार माझी तिजवर
जरी दूरदेशी ती असे
तिचाच ध्यास अन् सदोदित ती
मनात माझ्या वसे

आजोबांची नात जशी ही
गोड मिठाईमेवा
आनंदाचा मला गवसला
हा अनमोल ठेवा !

© स्वाती शृंगारपुरे
8692893984

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं