बाबा
*स्वातीचे शब्दमोती*
*बाबा*
आठवणींच्या राज्यात
मन माझे रमते
बाबा तुमच्या विरहाने
व्याकूळ ते होते
आजही आठवतो तुमचा
तो आश्वस्त स्पर्श
हट्ट माझे पुरवताना
होतसे तुम्हा हर्ष
हट्टी होते बाबा मी
कधी विचार केला नाही
मात्र हौस माझी पुरली नाही
असा दिवस गेला नाही
माझ्या उत्तम प्रगतीकडे
तुमचे असे लक्ष
वाचन करावे भरपूर मी
हा तुमचा असे कटाक्ष
तुम्हीच जाणवून दिलंत मला
काटकसरीचं मोल
पाठीशी ठाम उभे राहून
ढळू दिला नाहीत तोल
तुमच्या संस्कारातूनच
आज पडत आहे पाऊल
तरी मन डगमगते जेव्हा
अकल्पिताची लागे चाहूल
विश्वासाची माणसे कधी
निघून जातात सोडून साथ
नकळत अचानक सुटून जाती
हातामधले प्रेमळ हात
तेव्हा मात्र तुमच्या कुशीत
शिरावंसं वाटतं
गळामिठी मारून तुम्हा
रडावंस वाटतं
संपला ऋणानुबंध
तुटले रेशीमधागे
काहीच शिल्लक नाही म्हणता
उरल्या आठवणी मागे
शब्द मुके सूर मुके,माझी
कविताही अबोल झाली
वेदना उरांतली
आसवांत न्हाली
शोधते हे उदास मन
तुम्हा चंद्रतार्यांत ह्या
लाडक्या लेकीसाठी
बाबा तुम्ही परत या....
बाबा तुम्ही परत या...
©स्वाती शृंगारपुरे...
8692893984
🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹
*बाबा*
आठवणींच्या राज्यात
मन माझे रमते
बाबा तुमच्या विरहाने
व्याकूळ ते होते
आजही आठवतो तुमचा
तो आश्वस्त स्पर्श
हट्ट माझे पुरवताना
होतसे तुम्हा हर्ष
हट्टी होते बाबा मी
कधी विचार केला नाही
मात्र हौस माझी पुरली नाही
असा दिवस गेला नाही
माझ्या उत्तम प्रगतीकडे
तुमचे असे लक्ष
वाचन करावे भरपूर मी
हा तुमचा असे कटाक्ष
तुम्हीच जाणवून दिलंत मला
काटकसरीचं मोल
पाठीशी ठाम उभे राहून
ढळू दिला नाहीत तोल
तुमच्या संस्कारातूनच
आज पडत आहे पाऊल
तरी मन डगमगते जेव्हा
अकल्पिताची लागे चाहूल
विश्वासाची माणसे कधी
निघून जातात सोडून साथ
नकळत अचानक सुटून जाती
हातामधले प्रेमळ हात
तेव्हा मात्र तुमच्या कुशीत
शिरावंसं वाटतं
गळामिठी मारून तुम्हा
रडावंस वाटतं
संपला ऋणानुबंध
तुटले रेशीमधागे
काहीच शिल्लक नाही म्हणता
उरल्या आठवणी मागे
शब्द मुके सूर मुके,माझी
कविताही अबोल झाली
वेदना उरांतली
आसवांत न्हाली
शोधते हे उदास मन
तुम्हा चंद्रतार्यांत ह्या
लाडक्या लेकीसाठी
बाबा तुम्ही परत या....
बाबा तुम्ही परत या...
©स्वाती शृंगारपुरे...
8692893984
🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹
Comments
Post a Comment