अनामवीरा
*स्वातीचे शब्दमोती*
*अनामवीरा सलाम तुजला*
कोण बरे हा शेतामधूनी पिकवी माणिकमोती
साथ न देई निसर्ग तरीही घाम आपुला ओती
अपार मेहनत करुनी कोण हा रुजवी बीजाला
अनामवीरा सलाम तुजला तुझ्या अफाट जिद्दीला
येता जरी किती संकट मोठे त्यावर करीसी मात
कधी पूर,कधी अवर्षण सृष्टी देई ना साथ
कधी झेलावे लागे तुजला दुष्काळ वा मंदीला
अनामवीरा सलाम तुजला तुझ्या अफाट जिद्दीला
कधी करावी लागे तुजला दुबार पेरणी जीवघेणी
कधी गारपीट,कधी कीडही कधी बरसे अगणित पाणी
शूरवीर तू अतिधैर्याने झेलिसी आपत्तीला
अनामवीरा सलाम तुजला तुझ्या अफाट जिद्दीला
निरंत राहो धैर्य तुझे हे असेच अबाधित
पोशिंदा तू विश्वाचा तरी सदा उपेक्षित
नको हरवू देऊ राजा तुझ्या उमेदीला
अनामवीरा सलाम तुजला तुझ्या अफाट जिद्दीला...
© स्वाती शृंगारपुरे
8692893984

Comments
Post a Comment