पोवाडा

*स्वातीचे शब्दमोती*

  *स्त्री शक्ती -एक लोकजागर* (चाल - पोवाडा)

अगं नारी गं.. जीरंजीजी जीजीजी

सा-या सृष्टीचीही राणी
असे देखणी गोड हिची वाणी
पण रणांगणी मर्दानी
शत्रूला पाजतसे पाणी.. जीजीजीजी...

अशी ही स्त्री.. क्षणाची पत्नी ; तर अनंत काळची माता... पण प्राक्तनात हिच्या... नेहमीच उपेक्षा...

येता लेक ही जन्माला
बापदोष देत नशिबाला
अपराध काय मी केला
आली पोटी कन्या जन्माला जीजीजीजी

हळूहळू पोर मोठी होऊ लागते. घर ,  शाळा , अभ्यास सर्वच आघाड्या यशस्वीरित्या सांभाळते. सगळी आव्हाने झेलत ती यशिचे गड सर करते..

ज्ञानेशाची ती मुक्ताई
उपदेश जगाला देई
शिवबाची जिजाऊ आई
शूरवीर राष्ट्राला देई जीजीजीजी

ती बनली सावित्रीबाई
शिक्षणाचा ध्यास ती घेई
मर्दानी लक्षुमीबाई
इतिहास नोंद तिची घेई जीजीजीजी

असा प्रवास करत करत स्त्री अवकाशात झेपावली.. कल्पना चावला , सुनिता विल्यम्स..

तिथेही स्त्रीने आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली..
जिंकण्याची असे तीज आस
गवसणी घाली गगनास
भेदुनी जाय अंबरास
विस्तीर्ण तिचे आकाश जीजीजीजी

पाहिलंत लोकहो ?? किती विविध रुपे ही स्त्रीची !

अशा लेकी आम्ही सावित्रीच्या
अभिमान आहो राष्ट्राचा
विश्वास बाळगा अमुचा
फडकवू ध्वज विजयाचा जीजीजीजी..

अगं नारी गं.. जी रं जीजीजीजीजी..

© स्वाती शृंगारपुरे
📞8692893984

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं